शिरूरकासार दि.२०(प्रतिनिधी):तालुक्यातील (Shirur kasar)घाटशीळ पारगाव येथे अज्ञात चोरटयांनी भर दिवसा घरफोडी केल्याची घटना (दि.१९) शनिवार रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली असून चोरटयांनी ४८,००० हजारांचा (Crime)मुद्देमाल लंपास केला.
शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव (Beed)येथे वामनभाऊ महाराज यांचा नारळी सप्ताह सुरू होता. बाबासाहेब नवनाथ खेडकर (वय ३९) हे सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनासाठी गेले असता .दुपारी एकच्या सुमारास परत घरी आल्याच्यानंतर त्यांच्या घराचा दरवाज्या तोडून अज्ञात चोरटयांनी कपाटात ठेवलेले रोख ४८,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना (दि.१९) शनिवार रोजी घडली (Crime)असून बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून शिरूर कासार (Shirur kasar police)पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.