परळी वैजनाथ दि.१२(प्रतीनिधी)÷ शनिवार (दि.१२)रोजी सकाळपासून (onilne)ऑनलाईन व्यवहार ठप्प झाल्याने Google pay,phone pay ,paytem वापरकर्त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला दोन वाजेपर्यंत तर ही सेवा सुरु झाली नव्हती. या अचानक झालेल्या अडथळ्यामुळे युपीआय पेमेंट वर अवलंबून असलेल्या अनेक सेवा प्रभावित झाल्या. अनेकांना ही सेवा ठप्प झाल्याने त्यांच्या व्यवसायिक व वैयक्तिक कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला व मनस्ताप देखील सहन करावा लागला.
वीस दिवसांत तिसरी वेळ.
दि.१२ एप्रिल ÷शनिवार सकाळपासून या सुरु झालेल्या या समस्येमुळे हजारो वापरकर्त्यांना मोठा ञास सहन करावा लागला.
दि.2 एप्रिल ÷युपीआय वापरकर्त्यांना फंड ट्रान्स्फर करताना मोठ्या प्रमाणात समस्या येत होत्या.
दि.26 मार्च ÷या दिवशी युपीआय वापरकर्त्यांना दोन ते चार तास या सेवेचा लाभ घेता आला नाही.
सतत ह्या येणार्या तांत्रिक अडचणींमुळे दैनंदिन व्यवहारांसाठी युपीआय धारकांत चिंता निर्माण होत आहे.युपीआय प्रणालीच्या स्थिरतेवर व विश्वासार्हतेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.संबंधित यंञनेने यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.