गेवराई दि.८(प्रतिनिधी):तालुक्यातील(Georai) हिंगणी ते पाथरवाला बु कडे जाणाऱ्या रोडवरील के.टी वेअर बंधाऱ्यावरून अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच (दि.७) सोमवार रोजी रात्री १:५० च्या सुमारास कारवाई करत १,७६,००० रुपयांचा मुद्देमाल(Georai) जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे.त्यातच गेवराई(Georai) तालुक्यातील हिंगणी ते पाथरवाना बु कडे जाणाऱ्या रोडवरील के.टी वेअर बंधाऱ्यावरून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करताना शरद चव्हाण व जुगनू राधाकिसन विटोरे दोघे रा.पाथरवाला बु ता.अंबड ज. जालना यांच्यावर गेवराई पोलिसांनी (दि.७) सोमवार रोजी रात्री १:५० च्या सुमारास कारवाई केली.यात एक लाल रंगाचे महिंद्रा ट्रॅक्टर ५७५ सरपंच विना नंबरचे व एक (Georai police)लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली दोन्हींची अंदाजे किंमत १,७०,००० रुपये व एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६००० रुपये असा एकूण १,७६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.