Advertisement

संपादकीय अग्रलेख- बीडच्या बदनामीचा माध्यमी उठवळपणा

प्रजापत्र | Tuesday, 08/04/2025
बातमी शेअर करा

कोणत्याही गावात किंवा जिल्ह्यात एखादी घटना घडली म्हणून त्या गावाला किंवा (Beed)जिल्ह्याला बदनाम करणे हा त्या जिल्ह्यातील सामान्य नागरिकांवर देखील अन्यायच असतो. बारामतीत काही घडले म्हणून लगेच 'बीडचे वारे बारामतीत ' म्हणणे हा अतिशहाणपणा तर आहेच , पण माध्यमांच्या भूमिकेला आणि संहितेला देखील शोभणारा नाही. सध्या माध्यमांमधील काही अतिशहाण्यांनी बीडच्या मातीला बदनाम करण्याची जी सुपारी घेतली आहे , ती या मातीवर अन्याय (Beed)करणारी आहे.
 

चांगले आणि वाईट सगळीकडे असते . जशी गुन्हेगाराला जात किंवा धर्म नसतो, तसेच कोणताही भूभाग वाईट किंवा गुन्हेगारी नसतो. त्यामुळे एखाद्या भागात काही वाईट घटना घडल्या म्हणून लगेच जगातील कोणत्याही ठिकाणी घडलेल्या वाईट घटनांना त्या भागाचा सन्दर्भ लावणे चुकीचे आहे. सामान्यांकडून बोलण्याच्या ओघात किंवा पिढीजात परंपरागत नेणिवेतून ते होत असेल तर एकवेळ ते क्षम्य म्हणता येईल , मात्र स्वतःला मार्गदर्शक म्हणविणाऱ्या (Beed)माध्यमांनी असे काही करावे हे शोभणारे तर नाहीच, मात्र त्या भूभागावर अन्याय करणारे देखील आहे.
बारामतीमध्ये काही तरी घटना घडते, कोणीतरी कोणाला तरी मारते , आणि लगेच काही माध्यमे 'बीडचे वारे बारामतीत ' अशा प्रकारच्या बातम्या चालवितात , यापूर्वी देखील बीड पॅटर्न म्हणून काही प्रकरणात बीडची बदनामी केली गेलीच. एखाद्या भागातील चांगल्या गोष्टींची प्रेरणा घेण्यासाठी म्हणून त्या भागाचा आदर्श घेणे समजू शकते, पण कोणत्याही प्रकरणात एखाद्या जिल्ह्याला बदनाम करणे हा त्या जिल्ह्यातील जनतेवरही अन्याय असतो. वाईट घटना, दुर्घटना, गुन्हेगारीच्या घटना देशात सगळ्याच भागात होत असतात , पण म्हणून लगेच एखाद्या विशिष्ट भागाला त्यासाठी बदनाम करणे ही सडकी मानसिकता आहे, किमान माध्यमांमध्ये ती नसली पाहिजे. प्रश्न केवळ(Beed) बिडचाच नाही, तर सर्वच भागांचा आहे. आता दीनानाथ मंगेशकरसारखी घटना घडली म्हणून लगेच पुण्याला 'आरोग्याच्या क्षेत्रातील कसाईखाना ' म्हणायचे का ? असे कोणी म्हटले तर तमाम पुणेकरांच्या अस्मिता किती दुखावतील ? जिम माध्यमे पुण्याच्या भूमीतून निघतात, त्यांनाही किती वाईट वाटेल ? मग(Beed) बीडकरांनाच भावना नाहीत का ? माध्यमांच्या असल्या उठवळपणामुळेच आज बीडकरांना राज्यात जाताना काय यातना भोगाव्या लागत आहेत , साधी लॉज घ्याहूची म्हटले तर किती दिव्या करावे लागत आहे आणि हे वातावरण कसे निवळेल हे पाहण्याऐवजी राज्यात कोठे काही घडले की त्याला बीडचे वारे म्हणण्याचा अतिशहाणपणा किमान माध्यम क्षेत्रातील लोकांकडून तरी अपेक्षित नाही. 'जे खळांची व्यंकटी सांडो ' अशी आपली संस्कृती आहे, इथे वाईटपण संपण्याचे पसायदान मागितले जाते, यात कोठेही व्यक्तीद्वेष नाही, मग माध्यमांमधील काही डोक्यांमध्येसिव्ह एखाद्या भूभागाचा द्वेष कोठून येतो ? एखाद्या घटनेमुळे संपूर्ण समाजाला, संपूर्ण भूभागाला बदनाम करताना त्या जिल्ह्यातील लोकांचे चांगुलपण सर्रास विसरण्याचा करंटेपणा माध्यमांनी करू नये इतकेच .

 

Advertisement

Advertisement