बीड दि.६(प्रतिनिधी) : धावडी गावात एकाच (ambajogai)दिवशी दोन दुर्दैवी घटना घडल्या आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला असून या घटनांनी गावात खळबळ उडाली आहे. यात एका घटनेत एकाने आत्महत्या केली. (Beed)तर दुसरा युवक तलावात पोहण्यासाठी गेला असताना बुडाला असून गावकरी शोध घेत आहेत.
बीड जिल्ह्याच्या धावडी गावात या घटना ५ एप्रिलला घडल्या आहेत. या घटनांमुळे गावात चूल देखील पेटली नाही. यातील अंबाजोगाई शहरालगत असलेल्या रिंगरोड जवळील शेतामध्ये एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रामधन उर्फ करण अशोकराव नेहरकर (वय २५, रा. धावडी, ता. अंबाजोगाई) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने एका ढाब्याच्या मागील बाजूस असलेल्या शेतातील बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.
पोहायला गेला तो परतलाच नाही
सुटी असल्याने गावापासून जवळच असलेल्या तलावावर मित्र मित्र दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. धावडी येथील चौघे मित्र केंद्रेवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अंकुर राजाभाऊ तरकसे (वय १८) हा खोल पाण्यात गेल्याने तो परत वर आलाच नाही. मित्रांनी त्याचा शोध घेतला असता सापडून आला नाही.
२४ तासानंतरही सापडला नाही
घाबरलेल्या सोबतच्या मित्रांनी अंकुर बुडाल्याची माहिती गावात सांगितली. यानंतर ग्रामस्थ तलावावर गेले. यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र मृतदेह आढळून आला नाही. रात्री उशीर झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले असून २४ तास उलटून गेले तरी आणखी शोध लागला नाही.