बीड दि.६(प्रतिनिधी):तालुक्यातील(Beed) खामगाव शिवारातील सिंदफणा नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच (दि.५) शनिवार रोजी दोन ट्रॅक्टरवर कारवाई करत ८,०९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात(Beed police) आला आहे.
बीड तालुक्यातील खामगाव शिवारातील सिंदफणा नदी पात्रातून अवैध (Beed) वाळूची वाहतूक करताना इसान रज्जाक शेख व राहुल रामेश्वर हराळे दोघे रा.नांदूर हवेली ता.जि.बीड या दोघांवर बीड ग्रामीण पोलिसांनी (दि.५) शनिवार रोजी कारवाई केली यात १) एक जॉन डियर कंपनीचा ५२१० मॉडेल असलेला विना नंबर असलेला ट्रॅक्टर अंदाजे किंमत ४,००,००० व त्याच्यासोबत एक पिवळ्या रंगाची ट्रॉली अंदाजे किंमत १,००,००० व ट्रॉलीमध्ये अर्धा ब्रास वाळू किंमत ३०००, २) एक महिंद्रा सरपंच(Beed police) कंपनीचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत २,००,००० व पिवळ्या रंगाची ट्रॉली अंदाजे किंमत १,००,००० व ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू किंमत ६००० रुपये असा एकूण ८,०९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालक पसार झाले असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलिस करत आहेत.