Advertisement

बीडमध्ये फोडले घर 

प्रजापत्र | Saturday, 05/04/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.५ (प्रतिनिधी):शहरातील (Beed)शिवाजी धांडे नगर रेणू हॉस्पिटल परिसरातील ब्युटी पार्लर व घर फोडल्याची घटना (दि.३) गुरुवार रोजी घडली असून २,६३,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस(Beed police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

            बीड शहरातील शिवाजी धांडे नगर रेणू हॉस्पिटल परिसरातील(Crine news) राहणारे गणेश बाबुराव मिटकरी व सुनंदा विक्रम केदार यांच्या दोघांच्या घराचा व ब्युटी पार्लरचा दरवाजा अज्ञात चोरटयांनी तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून यात ७ ग्रॅमचे मिनी गंठण ,६ ग्रॅमचे मिनी गंठण,१२ ग्रॅमची सोन्याची साखळी,एक तोळ्याच्या तीन अंगठ्या,३५,००० रोख रक्कम व गणेश बाबुराव मिटकरी यांचे रोख १०,००० हजार रुपये असा दोघांचा(Beed police) मिळून २,६३,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.  
 

Advertisement

Advertisement