गेवराई : कर्जमाफीची (Georai)आशा मावळ्याने एका तरुण शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.१) रोजी रात्री घडली. आकाश श्रीराम रोडगे(वय ३६)रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे.सदरील शेतक-याने बॅक ऑफ महाराष्ट्राचे पत्नी वैशाली रोडगे यांच्या नावे ७० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते.
कर्ज भरणा (Georai)करण्यासाठी बँकेकडून तगादा लावल्याने सद्यपरिस्थितीत पैसे नसल्याने शेतकरी आकाश रोडगे हे मागील आठवड्यापासून चिंतेत होते.त्यातच कर्ज माफीची आशा मावळल्याने कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत असलेल्या आकाश याने मंगळवारी रात्री कुटुंबीयातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबीयाना याची माहीती होताच गेवराई (Georai police)पोलीसांना माहीती दिली.यावरून पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.आज (दि.२) रोजी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृत शेतकरी यांच्यावर रांजणीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात वडिल,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.