Advertisement

पुसऱ्यात भरदिवसा घरफोडी 

प्रजापत्र | Wednesday, 02/04/2025
बातमी शेअर करा

 वडवणी  दि.२ (प्रतिनिधी):- तालुक्यातील (Wadwani) पुसरा येथील शेतकरी आपल्या शेतात बाजरी काढण्यासाठी गेले असता (दि.३१) सोमवार रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत तब्बल २ लाख ९० हजार रुपायाच्या किंमतीचे सोन्याचे दागिने(Crime news) चोरट्याने लंपास केले आहेत. 

वडवणी तालुक्यातील पुसरा येथील नारायण मारोती नाईकवाडे (वय ६४) हे आपल्या (Wadwani)पत्नीसह  शेतात बाजरी काढण्यासाठी (दि.३१)मार्च रोजी सकाळी ११ वाजता गेले होते. दिवसभर शेतात काम करुन घरी परत आल्यावर घराच्या गेटचे कुलुप तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले व घरातील पत्राच्या पेटीमधील साहित्य खाली जमिनीवर फेकण्यात आलेले होते. हे पाहून शेतकर्‍यांच्या लक्षात आले की घरात चोरी झाली आहे.त्यांनी तात्काळ वडवणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलीस (Wadwani police)स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट, पोलीस नाईक विलास खरात, पो.काँ. इरमले, यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ पंचनामा केला.पत्राच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाल्याचे निदर्शनास आले यामध्ये एकूण २०,९००० रु किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे लंपास  झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध(Crime News) वडवणी पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Advertisement

Advertisement