बीड दि.२ (प्रतिनिधी): (Beed)धारूर तालुक्यातील पाचीपिंपळ तांडा व इतर ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. प्रशासन पातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही भूमिका घेतली जात नसल्याने आज (दि.२) रोजी येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश हंडामोर्चा काढला. (Morcha)या मोर्चामध्ये तांड्यावरील महिला व नागरिकांची उपस्थिती होती.
सध्या तिव्र उन्हाळ्याचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. (dharur)धारूर तालुक्यातील रूईधारूर, पाचीपिंपळ तांडा, विझीरातांडा, घोड्याचा माळे तांडा या ठिकाणी पाणी नाही. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
बातमी शेअर करा