माजलगाव दि.१(प्रतिनिधी): तालुक्यातील (Majalgaon) नागडगाव येथील लक्ष्मण खामकर यांचे घर चोरटयांनी (दि.३१) सोमवार रोजी(Crime) भर दुपारी फोडले. सोने,चांदीच्या दागिन्यांसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला.
माजलगाव तालुक्यातील नागडगाव येथील लक्ष्मण आश्रुबा खामकर(Majalgaon) हे एस टी महामंडळ माजलगाव डेपो येथे मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत (दि.३१) सोमवार रोजी खामकर आपल्या ड्युटीवर निघून गेले असता दुपारी साडेचारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने,चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी लक्ष्मण खामकर यांच्या (Crime)फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.