अविनाश इंगावले
गेवराई दि.३० (प्रतिनिधी ): तालुक्यातील (Georai) तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील अर्धामसला याठिकाणी मध्यरात्री दोनच्या दरम्यान मस्जित मध्ये जिलेथिन फटाक्याव्दारे स्फोट करून मस्जित पाडण्याच्या प्रयत्न काही समाजकंटक यांच्याकडून करण्यात आला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी घटनास्थळावर भेट दिली व शांतता राखण्याचे अवाहन केले
याबाबद सविस्तर माहिती (Georai)अशी की,विजय रामा गव्हाणे ( वय २२ वर्ष ) रा अर्धामसला, श्रीराम अशोक सांगडे (वय 24 वर्ष )रा अर्धामसला तालुका गेवराई जिल्हा बीड अशी या दोन आरोपींची नावे असून गावात उरूस चालू असताना त्याठिकाणी किरकोळ वाद झाला होता तसेच यातूनच वरिल आरोपींनी हे कृत केले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे तसेच ही घटना मध्यरात्री दोन च्या दरम्यान घडल्यानंतर सरपंच यांनी यांची माहिती तलवाडा पोलिसांना दिली तसेच पोलिस अवघ्या विस मिनिटात घटनास्तळावर दाखल झाले तसेच वरिष्ठ अधिकारी व बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी सदर (Beed police)ठिकाणी भेट दिली तसेच तसेच याप्रकरणी तात्काळ गून्हा दाखल केला असून यामध्ये बीड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पोउपनि स्वप्नील कोळी यांनी या दोन्ही आरोपी यांना शिंपेगाव याठिकावरून अटक केली असून सदर घटनेच्या अंनूषगाने कडक कार्यवाई व कठोर शासन करण्याच्या उद्देशाने बीड पोलिस काम करतील अशी ग्वाही बीड पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांनी दिली असून शांतता राखण्याचे अवाहनही त्यांनी केले आहे तसेच गेवराईचे आ विजयसिंह पंडित यांनी कसल्याही अफवाना नागरिकांनी बळी पडूनये असे अवाहन करण्यात आले आहे.