Advertisement

वाळूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई 

प्रजापत्र | Friday, 28/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२८(प्रतिनिधी): परळी हायवेवर (Beed)घोडका राजुरी तलावामध्ये अवैध वाळूची(sand) वाहतूक होत असल्याची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच (दि.२६) बुधवार रोजी कारवाई करत ७,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

बीड(Beed) तालुकयातील घोडका राजुरी येथील तलावामध्ये अवैध वाळूची वाहतूक करताना मोहम्मद मुजाहेद मोहम्मद दाउद रा.खासबाग ता.जि.बीड,सय्यद सुलतान सय्यद जैनोदीन रा.खासबाग ता.जि.बीड व टेम्पो मालक रफिक इनामदार रा.खासबाग ता.जि.बीड(Beed)या तिघांवर पिंपळनेर पोलिसांनी (दि.२६) बुधवार रोजी कारवाई  केली यात,एक टाटा कंपनीचा ७०९ टेम्पो क्र.एमएच ४८ एजी ३७३२ अंदाजे किंमत ७,५०,००० रुपये व दोन ब्रास वाळू अंदाजे किंमत २०,००० रुपये असा एकूण ७,७०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement