चकलांबा दि.२५(प्रतिनिधी): लमानवाडी(Shirur kasar) शिवारातील सिंधफणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा (Police)पोलिसांना मिळताच (दि.२४) रविवार रोजी दोन ट्रॅक्टरवर कारवाई करत ६,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरूर कासार(Shirur kasar) तालुक्यातील लमानवाडी शिवारातील सिंधफणा नदीपात्रातून अवैध वाळूची वाहतूक करताना गोविंद सुभाष पवार (वय ३४) व अरुण दिनकर काथे (वय ३८) दोघे रा.तरडगव्हण ता.शिरूर कासार जि.बीड(Beed) या दोघांवर चकलांबा पोलिसांनि (दि.२४) रविवार रोजी कारवाई केली यात, १)एक पॉवरट्रॅक ४४५ डी.एस कंपनीचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत ३,००,००० रुपये,एक निळ्या रंगाची दोन चाकी ट्रॉली अंदाजे किंमत ५०,००० रुपये व एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ३,००० रुपये, २) एक हिंदुस्तान ६० कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर क्र. एमएच २३ बीएच ३८०९ अंदाजे किंमत ३,००,००० रुपये असा एकूण ६,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई चकलांबा पोलिस करत आहेत.