चकलांबा दि.२४(प्रतिनिधी):गुत्तेगाव येथील गोदावरी नदी पात्रातून वाळूची अवैध (Sand smuggling)वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.२३) रविवार रोजी कारवाई करत ४,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात(Beed police) आला आहे.
बीड(Beed) जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु असून तरी देखील वाळूची चोरटी वाहतूक होताना दिसत आहे.गेवराई तालुकयातील गुत्तेगाव येथील गोदावरी नदी पात्रातून वाळूची (Crime)अवैध वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध चकलांबा पोलिसांनी (दि.२३) रविवार रोजी कारवाई केली.यात विना नंबरचे सोनालिका कंपनीचे डी.१ ट्रॅक्टर,ट्रॉली तसेच एक ब्रास वाळू असा एकूण ४,५३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ट्रॅक्टर चालक पोलिसांना पाहून ट्रॅक्टर जागीच सोडून पळून गेला असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करा