Advertisement

सिमेंट कंपनीचा मॅनेजर असल्याचे सांगून साडेतीन लाखांना फसवले

प्रजापत्र | Sunday, 23/03/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२३(प्रतिनिधी): बिर्ला शक्ती या सिमेंट(shakti birla) कंपनीचा मराठवाड्याचा मार्केटिंग मॅनेजर असल्याचे सांगून तुम्हाला कमी दरामध्ये सिमेंट व स्टिल देतो, असे सांगून बीड शहरातील सुनील चव्हाण यांच्याकडून तब्बल साडेतीन लाख रुपये घेऊन सिमेंट व स्टिल तर दिलेच नाही (Beed)उलट पैसेही परत केले नाही.  चव्हाण यांची फसवणुक झाल्याने त्यांनी अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शैलेंद्र कुमार रावत याच्या विरोधात फसवणुकीचा(Crime news) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या पाठिमागे राहणारे सुनील नवनाथ चव्हाण(Beed) यांना गेल्या काही वर्षापुर्वी उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात असलेल्या अवलेशपुर कंडवा येथील  शैलेंद्र कुमार अरविंद रावत याने आपण बिर्ला शक्ती या सिमेंट कंपनीचा मराठवाड्याचा मार्केटींग मॅनेजर आहे, तुम्हाला बांधकामासाठी इतरांपेक्षा कमी दराने सिमेंट आणि स्टील देतो, असे सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी (दि.२७) जून १०१९ रोजी दुपारी १ वाजता बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेतून आपल्या खात्यातून सुमारे साडेतीन (Crimen news)लाख रुपये रावत याच्या खात्यात ट्रान्सफर केले. वेळोवेळी सिमेंट आणि लोखंडाची त्यांनी मागणी केली. मात्र रावत यांनी चव्हाण यांना सिमेंट अथवा लोखंड वेळेत दिले नाही. तब्बल दोन ते तीन वर्षे रावत यांच्याकडे चव्हाण आपल्या पैशाची मागणी करत राहिले. शेवटी सिमेंट आणि स्टील तर दिलेच नाही, पैसेही परत केले नाही म्हणून शैलेंद्रकुमार रावत याच्या विरोधात चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून  गुरनं १६९/२०२५ कलम ४२० भा.द.वी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement