बीड दि.२२(प्रतिनिधी): तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असलेल्या (Accident)नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे वाहन पुलाला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना आज (दि.२२) शनिवार रोजी पहाटे बीड-गेवराई रोडवर घडली आहे. या अपघातात दोन ठार आणि सातजण गंभीर जखमी झाले (Beed)आहेत. लोणारे कुटुंबावर काळाने झडप घालून दोघांना कायमचे हिरावून नेले आहे. जखमी मध्ये तीन लहान मुलं आणि मयतमध्ये एका ५ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे.
योगेश पोपट लोणारे (वय ४० वर्ष), इश्वरी रामेश्वर लोणारे ( वय ५ वर्ष) असे मयतांची नावे (Accident)असून पूजा रामेश्वर लोणारे ( वय २५ वर्ष), पूनम योगेश लोणारे (वय ३० वर्ष), समर्थ योगेश लोणारे (वय १० वर्ष), श्रावणी योगेश लोणारे (वय ४ वर्ष), शंभू योगेश लोणारे (वय १७ वर्ष), रामेश्वर पोपट लोणारे (वय ३७ वर्ष), दत्तात्रय सोमनाथ अडवाई (वय ४५ वर्षं) असे सातजण गंभीर जखमी असून हे सर्व रा. सिन्नर (जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. (Accident)ते सिन्नर येथून तुळजापूर येथे इको या चारचाकी कार क्र. एम.एच. १५ एचएम ६७१६ लोणारे कुटुंब दर्शनासाठी चालले होते. दरम्यान ते गेवराईच्या पुढे बीड कडे येताना रांजणी पाटीजवळ पहाटे ही कार पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकले. यामुळे घडलेल्या(Beed) भीषण अपघातात लोणारे कुटुंबावर काळाने झडप घातली. अपघात घडल्यानंतर प्रवाशांमी मदत केली. रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना तातडीने (Beed civil hospital)बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे अपघात विभागात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान योगेश पोपट लोणारे यांचा मृत्यु झाला या पाठोपाठ इश्वरी रामेश्वर लोणारे हीचाही मृत्यु झाला आहे. इतर सात जणांवर उपचार सुरू आहेत.