Advertisement

मॅनेजरची गॅस एजन्सी कार्यालयातच आत्महत्या 

प्रजापत्र | Saturday, 22/03/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२२(प्रतिनिधी): इंडियन गॅस (Gas)एजन्सीचा मॅनजरने बार्शी रोडवरील एजन्सीच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (दि.२२) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात(Beed) दाखल केला आहे. 
                   संतोष एकनाथ जाधव (वय ४० वर्ष) रा. बार्शी नाका असे मयत मॅनेजरचे आहे. ते इंडियन गॅस एजन्सी मध्ये मागील २० वर्षापासून मॅनेजर म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. आज शनिवारी सकाळी एजन्सी मधील एका केबिनमध्ये संतोष जाधव यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत(Crime) मृतदेह आढळला आहे. घटनेची पेठ बीड पोलीसांना माहिती दिली असता, तत्काळ पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला व प्रेत(Beed) शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. जाधव यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

Advertisement

Advertisement