गेवराई दि.२२(प्रतिनिधी):तालुक्यातील बाग(Georai) पिपंळगाव येथे वाळूची (Sand)अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच (दि.२१) शुक्रवार रोजी दीडच्या सुमारास(Beed) कारवाई करत ८,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरु आहे.त्यातच (Georai) गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथे अवैध वाळूची वाहतूक करताना अज्ञात चालकावर गेवराई पोलिसांनी (दि.२१) शुक्रवार रोजी कारवाई केली.यात विना नंबर स्वराज ७४४ एक्स टी कंपनीचे ट्रॅक्टर,विना नंबरची (Sand)लाल व पिवळ्या रंगाची ट्रॉली अंदाजे किंमत ८,००,००० रुपये तसेच (Beed)एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६,००० असा एकूण ८,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालक पसार झाला असून त्याच्या विरुद्ध गेवराई पोलीस (Georai police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.