बीड दि.२० (प्रतिनिधी): अल्पवयीन (Beed)मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडून जवळपास दिड महिना झाला.(Crime) युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही अद्याप मुलीचा शोध लागला नाही. नातेवाईकांनी पोलीसांकडे विचारपूस केल्यास प्रत्येकवेळी उडवा उडवीची उत्तरे देत प्रकरण मिटवण्यास सांगत(Police) असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर पिडित मुलीच्या आईने युसूफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर येऊन अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (दि.२०) गुरुवार रोजी दुपारी अंबाजोगाई तालुक्यातील युसूफ बडगाव पोलीस ठाण्याच्या समोर घडली. सदरील महिला पोलीस ठाण्याच्या दिशेने धावत आली आणि अंगावर डिझेल ओतून घेतले. त्याचवेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलीसांकडून सुरूवातीपासूनच टोलवा-टोलवी
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली.
त्यानंतर पिडितेच्या आईने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला तर तिला ते आमच्या हद्दीत नाही. युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला जा असे सांगण्यात आले. तेथून महिला युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गेली. फेब्रुवारीमध्येच गुन्हा दाखल झाला, मात्र अजुनही अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्याने तिच्या आईने आज आत्मदहन करण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलले. एकूणच या प्रकरणात पोलीसांनी सुरूवातीपासूनच टोलवाटोलवी केल्याचे दिसुन येते.