Advertisement

आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

प्रजापत्र | Thursday, 20/03/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२० (प्रतिनिधी): वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, (Beed)बीडची आठवले गँग, यानंतर आता आष्टीच्या भोसले गँगवर मकोका लावण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांत अशा प्रकारच्या तीन कारवाया केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.(Beed police) विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. 

 

आष्टी (Ashti)तालुक्यातील हातोळण येथील अजिनाथ विलास भोसले, भरत विलास भोलसे, या दोन सख्ख्या भावांचा खून करून कृष्णा भोसले याला गंभीर जखमी केल्याची घटना १६ जानेवारी २०२५ रोजी वाहिरा येथे घडली होती. (Crime)याप्रकरणी अजिनाथची पत्नी चिब्बा (वय ३०) हिच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यातील सहा आरोपींना अटकही केली होती. दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले, सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे,मुद्दसर मन्सुर पठाण,सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले,शशिकला दीपक भोसले आणि संध्या कोहीनुर भोसले अंभोरा पोलिसांनी या सर्व आरोपींच्या गुन्ह्यांची माहिती काढून मकोकाचा प्रस्ताव तयार केला. १० मार्च रोजी हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नवनीत काँवत (Beed police)यांच्याकडे आला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी तो शिफारशीसह छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांना पाठविला. त्यांनी १९ मार्च रोजी याला मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे आता पहिल्या खुनाच्या गुन्ह्यात मकोकाचे कलम वाढविण्यात आले आहे. याचा पुढील तपास हा आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे हे करत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement