Advertisement

वाळूची चोरटी वाहतूक करताना हायवा पकडला 

प्रजापत्र | Tuesday, 18/03/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.१८ (प्रतिनिधी): जायकवाडी कॅनॉल (Georai)जवळ हायवे क्र.५२ वर छत्रपती संभाजीनगर कडून(Beed) बीडकडे जाणाऱ्या रोडवर अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच(Sand) गेवराई पोलिसांनी (दि.१७) सोमवार रोजी कारवाई करत १८,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

       महिनाभरापासून अवैध (Beed)वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे.अश्यातच गेवराई तालुक्यातील जायकवाडी कॅनॉल जवळ हायवे क्र.५२ वर छत्रपती संभाजीनगर कडून बीडकडे जाणाऱ्या रोडवर अवैध वाळूची वाहतूक करताना गणेश अशोक जाधव रा.ब्रम्हगाव ता.गेवराई व तुषार गंगाराम  जाधव रा.पांढरवाडी ता.गेवराई यांच्यावर गेवराई पोलिसांनी (दि.१७) सोमवार रोजी कारवाई केली. यात हायवा क्र.एमएच  ०९ एफएल ९७६६ किंमत १८,००,००० तसेच पाच ब्रास वाळू किंमत १५,००० असा एकूण १८,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई (Georai police)गेवराई पोलीस करत आहेत. 
  

Advertisement

Advertisement