Advertisement

अवैध वाळू वाहतुकीवर माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई 

प्रजापत्र | Monday, 17/03/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.१७(प्रतिनिधी):तालुक्यातील कवडगावथडी (Majalgaon)शिवारातील गोदावरी नदीपात्रातून वारोळा कडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी (दि.१६) रविवार रोजी कारवाई(Crime) करत १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

मागील काही दिवसांपासून (Beed)अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.या कारवायांमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत अश्यातच माजलगाव तालुक्यातील कवडगावथडी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून वारोळा कडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक (Majalgaon)करताना गोरख बंन्सीधर तौर (वय ४०) रा.कवडगावथडी ता.माजलगाव यांच्यावर (Majalgaon gramin police)माजलगाव ग्रामीण पोलिसांनी  (दि.१६) रविवार रोजी कारवाई केली.लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर घेईन चालक पोलिसांना पाहताच पसार झाला. यात लाल पिवळ्या रंगाची विनानंबर ट्रॉली तसेच १ ब्रास वाळू किंमत ६००० रुपये असा एकूण १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.  
 

Advertisement

Advertisement