आष्टी दि.१६ (प्रतिनिधी): विकास आण्णा बनसोडे हा मागील तीन वर्षांपासून (Beed)ट्रक चालक म्हणून कामाला होता. दोन दिवसापुर्वी तो गावात आला असता कुटुंबातील काही लोकांनी त्याला डांबून (ashti)ठेवत मारहाण केली.या मारहाणीत त्याचा शनिवार (दि.१५) रोजी रात्री मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मारहाण का व कोणत्या कारणावरुन केली याचे कारण अद्याप समोर आले नाही.
आष्टी(Ashti) तालुक्यातील पिंपरी (घुमरी) येथील एका कुटुंबाकडे मागील तीन वर्षांपासून (jalna)जालना जिल्ह्य़ातील बोरगांव येथील २३ वर्षीय विकास बनसोडे हा ट्रक चालक म्हणून काम करत होता. पण काही महिन्यांपुर्वी त्याला कामावरून काढले होते. बनसोडे हा पिंपरी या गावात मित्रासह दोन दिवसापुर्वी आला होता. मित्र पळून गेला. मालकाने विकासला पकडून डांबून ठेवत बेदम मारहाण केली. (Beed crime news)त्या मारहाणीत त्याचा शनिवार (दि.१५) रोजी मृत्यु झाला. मारहाण करून खून का केला याचे कारण अद्याप समोर आले नाही.मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे.