माजलगाव दि.१५ (प्रतिनिधी): माजलगाव शहरामध्ये एक तरुण तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती माजलगाव शहर पोलिसांना मिळताच सापळा रचून (दि.१४) शुक्रवार रोजी या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे अमोल बबनराव गावडे रा.पंचशीलनगर माजलगाव हा अवैधरित्या स्वतःच्या ताब्यात तलवार बाळगून परीसरात दहशत माजवत असल्याची माहिती माजलगांव शहर पोलीसांना मिळताच सापळा रचून (दि.१४) शुक्रवार रोजी या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून अमोल बबनराव गावडे रा. पंचशीलनगर माजलगाव याच्या विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई नवनित कॉवत पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना लिडके अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, नीरज राजगुरु पोलीस उपअधीक्षक उपविभाग गेवराई, अति.पदभार माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे, पोहेको किशोर जाधव,पोलीस अंमलदार सुनिल गवळी यांनी केली आहे.