बीड दि.१५(प्रतिनिधी): शिवसेना (shivsena)उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर बीडचे (Beed)उल्हास गिराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे (parmeshwar satpute)जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षांकडून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी (Santosh deshmukh)संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू (dadasaheb khindkar)दादासाहेब खिंडकर यांच्यावर आरोप केले होते. पत्रकार परिषद घेऊन खिंडकर यांचे आका माजी आ.अमरसिंह पंडित असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर पक्षाने याची गांभीर्याने दखल घेत त्यांची हकालपट्टी केली.(Beed) त्यांच्या जागेवर उल्हास गिराम पाटील यांच्यावर गेवराई,आष्टी मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बातमी शेअर करा