Advertisement

खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा

प्रजापत्र | Thursday, 13/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१३(प्रतिनिधी): बॅटने मारहाण (Beed police)केल्याच्या प्रकरणातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणारा सतिश भोसले उर्फ खोक्या असल्याचे समोर आले. सदरील व्हिडीओनंतर पोलिसांनी खोक्याच्या विरुध्द कारवाईचा फास आवळला. आतापर्यंत त्याच्या विरुध्द तीन गुन्हे दाखल झाले असून अनेक(beed) व्हिडीओ समोर आले आहे. पोलिसांनी उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमधून खोक्या उर्फ सतिष भोसले याच्या मुसक्या आवळल्या. त्याला प्रयागराजमधील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने (Satish bhosale)खोक्याला ४८ तासांची ट्रान्झिट रिमांड दिली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेवून जाण्यासाठी ही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक असते. त्याअनुषंगाने प्रयागराज न्यायालयाने खोक्याला ४८ तासांची रिमांड दिल्याची माहिती बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिली आहे.(Beed police) या ट्रान्झिट रिमांडमुळे खोक्याला बीडमध्ये आणण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला असून पुढील ४८ तासात खोक्या बीड पोलिस ठाण्यात दिसेल.
 

Advertisement

Advertisement