Advertisement

माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही

प्रजापत्र | Wednesday, 12/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई : शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज बुधवारी मुंबईत आंदोलन झालं. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह १२ जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे (Ambadas Danve) अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil)यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना एक खळबळजनक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? त्यांचा रोख कोणाकडे होता? यासंदर्भात स्पष्टपणे जयंत पाटील भाषणात काहीच बोलले नाही. मात्र, यावेळी (Raju Shetti)राजू शेट्टी यांनी आपलं ऐकलं असतं तर ते खासदार राहिले असते, असंही पाटील म्हणाले. लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार राहिले असते. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असं (Jayant Patil)जयंत पाटील यांनी म्हटलं.भाषणात जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला घेरलं. विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे.(Raju Shetti) राजू शेट्टी यांना माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आला आहे. आम्ही भाषण करुन दमलो आहोत. कारण लोकांना पैसे देऊन शांत केलं जातं. तसेच हिंदुत्व समोर असतं. मग तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल, अशी फटकेबाजी पाटलांनी यावेळी केली.

Advertisement

Advertisement