बीड दि.१२ (प्रतिनिधी) : एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण करणारा भाजपचे (suresh dhas)आ.सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा सहा दिवसांपासून फरार होता. त्याला प्रयागराजमधून बीड (Beed police)पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खोक्या उर्फ (satish bhosale)सतीश भोसले गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता. पोलीस त्याच्या लोकेशनचा शोध घेत होते. खोक्याचं शेवटचं लोकेशन प्रयागराज मिळालं होतं. उत्तर प्रदेश पोलीस आणि प्रयागराज पोलिसांशी समन्वय साधून खोक्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यानी दिली.
पोलिस अधीक्षक काँवत पुढे म्हणाले की, (Beed police)आमची टीम प्रयागराज येथे पोहोचत आहे. उद्या किंवा परवा त्याला इथं आणलं जाईल. दुसऱ्या राज्यात अटक असल्यानं आजच ट्रान्झिट रिमांड करुन ताब्यात घेतलं जाईल. (Beed)खोक्यावर दोन गुन्हे ३०७ चे आणि एक गुन्हा एनडीपीएसचा असल्याची माहिती देखील काँवत यांनी दिली.