Advertisement

 आता नियमबाह्य भोंगे रडारवर

प्रजापत्र | Tuesday, 11/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई : प्रार्थनास्थळांवरील आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यांबाबत राज्य सरकारने नियमावली तयार केली असून संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात कुचराई केली तर त्यांच्यावरच कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आ.देवयानी फरांदे यांनी विधानसभेत भोंग्यावरुन विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavisयांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुठेही भोंगा लावताना त्याची परवानगी घेतली पाहिजे. हे भोंगे रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजे. सकाळी ६ ते रात्री १० वाजतेपर्यंत भोंगे लावता येणार येतील तसेच. दिवसा भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबलपर्यंत असला पाहिजे. त्यापेक्षा अधिक मर्यादा असू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

या संदर्भात कायद्यानुसार भोंग्याची डेसिबलची मर्यादा ओलांडली असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाला कारवाई अधिकार केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार मंडळाने पोलिसांनी कळवायला हवे. त्यानंतर मंडळानेच कोर्टात केस टाकावी. आरोपपत्र दाखल केले पाहिजे. पण या गोष्टींचा अवलंब होताना दिसत नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कुणालाही सरसकट भोंग्याची परवानगी मिळणार नाही. ती निश्चित कालावधीसाठी असेल. कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा परवानगी घ्यावी लागेल. तसेच ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी मिळणार नाही. त्यांचे भोंगे जप्त केली जातील. आणि त्या संदर्भात आमदार फरांदे यांनी जी मागणी केली आहे, त्यानुसार याचे तंतोतंत पालन होते की नाही, ते पाहिले जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाची असेल. पोलिस निरीक्षकाने प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतली की नाही ते तपासावे. प्रत्येक पोलीस ठाण्यात डेसिबल मोजण्याचे मीटर दिले आहे. त्यांनी आवाज मोजावा. मर्यादेपेक्षा जास्त आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीबीसीला सांगून त्यानुसार कारवाई करावी, दुसऱ्या टप्प्यात परवानगीची नूतनीकरण करु नये. त्यावर कडकपणे लक्ष ठेवले जाईल. जर स्थानिक पोलिस निरीक्षकाने कारवाई केली नाही तर त्याच्यावरच कारवाई केली जाणार आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

Advertisement

Advertisement