गेवराई दि.७ (प्रतिनिधी) तालुक्यातील तपोनिमगाव येथे विनापरवाना (Georai)ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना मिळताच सापळा रचत (दि.३) रोजी कारवाई करत १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गेवराई तालुक्यातील तपोनिमगाव येथे अवैध वाळू वाहतूक करताना अंगत विठ्ठल शिंदे रा.तपोनिमगाव ता.गेवराई यांच्यावर तलवाडा पोलिसांनी (दि.३) रोजी कारवाई केली.यात स्वराज्य कंपनीचा लाल रंगाचा विना नंबरचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.बाळू जाधव यांच्या(beed police) फिर्यादवरून(दि.६)रोजी कलम ३०३, (२) बी एस एम प्रमाणे आरोपी अंगत विठ्ठल शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत .
बातमी शेअर करा