Advertisement

नेकनूरमध्ये पाठलाग करून आवळल्या दोन आरोपींच्या मुसक्या

प्रजापत्र | Tuesday, 25/02/2025
बातमी शेअर करा

 नेकनूर दि.२५(वार्ताहर): दरोडा,अपहरणासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन आरोपींना (Neknoor police) नेकनूर पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे.शहरातील महामार्गावर चोर-पोलिसांचा खेळ रंगल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.(Solapur)सोलापूरची स्थानिक गुन्हे शाखा व नेकनूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.  

 

   बाबू आहेर (रा.बीड),(Beed)अविनाश पडुळे (रा.बीड) असे दोन आरोपींचे नावे आहेत.या दोघांवर सोलापूरच्या(Mohol Police Station)मोहोळ पोलीस ठाण्यात दरोडा,अपहरण, लुटमारसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.दोन्ही आरोपी गुन्हे करून केज(kaij)मार्ग बीड(Beed) जिल्ह्यात कार (एम.एच.२२,ए.एम.३४४६) ने येत होते. याची माहिती (Neknoor Police)नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र दोन्ही आरोपींनी पोलिसांना पाहताच गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर (Beed police)त्यांच्या गाडीला पोलिसांच्या गाड्या थोड्याच अंतरावर गेल्यानंतर आडव्या लावण्यात आल्यामुळे त्यांना पकडण्यात यश आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी,सचिन वंजारे,बाळासाहेब ठाकणे,अब्दुल सय्यद,मुन्नजीबी अत्तार यांनी केली. 
 

Advertisement

Advertisement