Advertisement

ट्रेनी शिक्षकांचे ठिय्या आंदोलन

प्रजापत्र | Monday, 24/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२४ (प्रतिनिधी): (Beed)जिल्ह्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या (school)शाळांवर मानधन तत्वावर ट्रेनी(teacher)शिक्षकांची नियुक्ती केली आहे. परंतु त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. आज  (दि.२४) पासून ट्रेनी शिक्षकांनी विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. 

अधिक माहिती अशी कि, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी ट्रेनी शिक्षकांनी आज सोमवार (दि.२४) रोजी सकाळपासून (beed)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढविण्यात यावा, शासकिय सेवेत १५% जागा आरक्षित ठेवाव्यात, मासिक वेतन २५००० हजार रु. करण्यात यावे,सर्वांचे शिफारस पत्र स्विकारण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी बीड जिल्यातील ट्रेनी शिक्षकांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. 

Advertisement

Advertisement