बीड दि.२४ (प्रतिनिधी)- विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी स्वामी नरेंद्र महाराज (Swami Narendracharayaji Maharaj) यांच्याबद्दल एकेरी भाषेत उल्लेख करत अपमानास्पद वक्तव्य केल्याने राज्यभरातील स्वामी नरेंद्र महाराज यांचे भक्त प्रचंड संतापले असुन ठीकठिकाणी वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात येत असुन बीडमध्ये (Beed)आज (दि.२४) सोमवार रोजी अचानक मोठ्या जमावाने रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ झाली तर महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.वाहतूक पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
बातमी शेअर करा