Advertisement

अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरु 

प्रजापत्र | Friday, 21/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी):- (Beed )नगर पालिकेच्यावतीने मागील चार ते पाच दिवसापासून अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील  ठिकठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येत आहे. आज (दि.२१) रोजी शहरातील बशीरगंज ते नवी भाजी मंडई, आदर्श मार्केट, सुभाष रोड, स्टेडियम परिसर, धोंडीपुरा या भागातील रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले असुन आदर्श मार्केटच्या दुकानासमोरील सर्वच अतिक्रमण काढल्याने व्यापारी आक्रमक होत आज आपले (Shop)दुकाने बंद ठेवून अतिक्रमणा विरोधात निषेध नोंदवला आहे.

बीड शहरातील नगर रोड, बार्शी रोड, राजुरीवेस या भागातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. काही ठिकाणी अतिक्रमण पाडापाडी होण्याच्या अगोदर लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून बाजूला ठेवले होते. शिवजयंतीनिमित्त दोन दिवस मोहिम थांबवण्यात आली होती.आज  (दि.२१) रोजी परत सुरू करण्यात आली.काही ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचे दिसत आहेत. मोहिम पुढे चालू मात्र पाठीमागे पुन्हा अतिक्रमण होवू नये यासाठी (Beed )नगरपालिकेने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकत आहे. दरम्यान आज शहरातील बशीरगंज ते नवी भाजी मंडई, आदर्श मार्केट या रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले असुन आदर्श मार्केटच्या दुकानासमोरील सर्वच अतिक्रमण काढल्याने व्यापारी आक्रमक झाले होते.

Advertisement

Advertisement