बीड दि. १८ (प्रतिनिधी ) :(Beed) 'बीडच्या नाट्यगृहात नाट्यगृह म्हणावे असे काहीच नाही, इथे साधे तिकीटघर नाही, (Shouchalay)शौचालयाची चांगली व्यवस्था नाही , हे सारे पाहून आम्ही पुन्हा बीडमध्ये नाटक घेऊन येऊच शकत नाही' या शब्दात प्रसिद्ध (Actor Sharad Ponkshe) कलाकार शरद पोंक्षे यांनी बीडच्या (Yashwantrao chavan Nattyagruha)यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरवस्थेचे अक्षरशः वाभाडे काढले. यामुळे बीड(Beed) शहराच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली. बीड नगरपालिकेच्या कारभारातील 'अंधेर'च या निमित्ताने उघड झाला आहे.
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल यापूर्वी अनेकदा बोलले गेले आहे. जिल्ह्यातील कलाकारांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या, मात्र नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या नाट्यगृहाची पूर्ती वाताहत झाली आहे. याचा प्रत्यय आता प्रसिद्ध नाट्यकर्मी शरद पोंक्षे यांनाही आला.
बीडच्या (Beed)नाट्यगृहात नाट्यकर्मी शरद पोंक्षे यांच्या 'पुरुष ' या नाटकाचा शो होता. त्यासाठी त्यांची संपूर्ण टीम आली होती. नाटक संपत असताना मात्र शरद पोंक्षे यांनी बीडकर रसिकांची माफी मागून नाट्यगृहाच्या दुरावस्थेचे अक्षरशः वाभाडे काढले. 'या नाट्यगृहासाठी आमच्याकडून एसीचे म्हणून २१ हजार भाडे घेतले गेले. इतके भाडे मुंबईमध्ये देखील नाही, आणि इतके करून नाट्यगृहात एसीचा नाही , साधी लाईटची व्यवस्था चांगली नाही, मेकअप रूम नाही, इथे फिनेल देखील आम्हाला स्वतःला आणावे लागले. येथील शौचालय वापर करता येणार नाही इतके घाण आहेत. हे असे असेल तर येथे नाटकांचे शो होतील कसे ? मी तरी यापुढे बीडला नाटक घेऊन येणार नाही. इथल्या नेत्यांना या साऱ्या प्रकारचे काहीच कसे वाटत नाही ' असा सवालांचा भडीमार शरद पोंक्षे यांनी केला. यामुळे बीड शहराचाच अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
एकेकाळचे भूषण , आज कलाकार देताहेत दूषणं
बीडच्या नाट्यगृहाची ज्यावेळी निर्मिती झाली, त्यावेळी या नाट्यगृहाकडे बीडचे नव्हे तर मराठवाड्याचे भूषण म्हणून पहिले जात होते. मराठवाड्यात असे नाट्यगृह नाही असे राज्यातले कलाकार आवर्जून सांगायचे. याच नाट्यगृहात अगदी नाट्यसंमेलनाचे देखील कार्यक्रम झाले होते. मात्र मागच्या काही वर्षात या नाट्यगृहाची इतकी दुरावस्था झाली आहे, की आता येणारा प्रत्येकजण नाट्यगृहाला दूषणे देत आहे.
मुख्याधिकाऱ्यांना नाही गांभीर्य
एकेकाळी बीडचे वैभव असणाऱ्या वास्तूची झालेली वाताहत केवळ नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे झालेली आहे. येथील मुख्याधिकारी नीता अंधारे यांना याचे कसलेच गांभीर्य नाही. नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक असताना त्यांना किमान बोलता तरी येत होते आणि लोकलाजेस्तव का होईना, त्यांना काही करावे लागले असते, मात्र मुख्याधिकारी एकतर भेटतही नाहीत आणि त्यांना पुन्हा बीडच्या अब्रूची काही चाड आहे असेही कधी वाटले नाही. त्यामुळे आता असला 'अंधेर नगरी ' कारभार आणखी किती दिवस चालवायचा आहे हे जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांसह पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी देखील ठरवावे.
१० महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना नाही पगार
नाट्यगृहात साधी झाडलोट करायला , कचरा उचलायला देखील कोणी कर्मचारी नाहीत असे शरद पोंक्षे म्हणाले, त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला १० महिन्यांपासून पगार नाही, आम्ही तरी काम कसे करायचे असा सवाल विचारला .