बीड-पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बुधवारी (दि.२७) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. या महिन्यात दहाव्यांदा इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.बीडमध्ये डिझेल ८३.२७ तर पेट्रोल ९४ रुपयांच्या घरात गेले आहे.सातत्याने होणार दरवाढ पाहता लवकरच पेट्रोल महाराष्ट्रात १०० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.राजस्थानच्या गंगानगरमध्ये बुधवारी पेट्रोल १०० रुपये १ लिटरवर गेले होते. यासोबतच मुंबईमध्ये पेट्रोल ९२.८६ आणि दिल्लीमध्ये ८६.३०रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये १० वेळा वाढ झाली आहे. बीडमध्ये आज डिझेल ८३.२७ तर पेट्रोल ९४.१२ रुपयांच्या घरात गेले असल्याचे पाहायला मिळाले.
बातमी शेअर करा