बीड दि.१४ (प्रतिनिधी)- (Beed)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी ट्रेनी(treni shikshak) शिक्षकांनी आज (दि.१४)रोजी दुपारी जिल्हा(Jilha parishad beed) परिषदेवर मुक मोर्चा काढून प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ बाढवण्याची मागणी केली. भर उन्हात मोर्चा काढत जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या मांडला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री(mukhyamantri) युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ट्रेनी शिक्षकांसह अन्य प्रशिक्षणार्थींची नियुक्ती जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थीचा यामध्ये समावेश असुन सदरील योजनाचा कार्यकाळ वाढवण्यात यावा, विद्यवेतनामध्ये वाढ करण्यात यावी आणि युवा प्रशिक्षणार्थीना शासकीय सेवेत १५ % आरक्षण देण्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या मुक मोर्चात जिल्हाभरातील
प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाढलाच पाहिजे, आम्हाला न्याय द्या, भिक नको हक्क द्या, प्रशिक्षणार्थीना न्याय द्या अशा घोषवाक्यांचे फलक हाती घेवून प्रशिक्षणार्थी मुक मोर्चात सहभागी झाले होते.