Advertisement

दहा दिवसांपासून सोयाबीनची खरेदी बंद

प्रजापत्र | Thursday, 13/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१३ (प्रतिनिधी): सोयाबीन (soybean)उत्पादक (beed)शेतकर्‍यांच्या घरातलं सोयाबीनचं शेवटचं पोतंही राज्य शासन खरेदी करेल, असे मुख्यमत्र्यांनी आश्‍वासन दिले खरे मात्र सहा जानेवारीपासून नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र राज्य शासनाने बंद केल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी नाफेड केेंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लावून ताटकळत असल्याचे चित्र अंबाजोगाईच्या हनुमंतवाडी शिवारात पहायला मिळत आहे. रात्रीतून सोयाबीन चोरीस जाऊ नये म्हणून (farmer) शेतकर्‍यांना रात्र जागून काढावी लागत आहे तर ज्या वाहनातून सोयाबीन (soybean)खरेदी केंद्रावर आणला आहे त्या वाहनांना रोज हजार ते दोन हजार रुपये द्यावे लागत आहेत. गेल्या दहा दिवसात दहा हजारापेक्षा जास्त रुपयांचे भाडे शेतकर्‍यांना भुर्दंड म्हणून पडले आहे.

बीड (beed)जिल्ह्यातल्या परळी, अंबाजोगाई  तालुक्यांसह अन्य भागांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा झाला. उत्पन्नही बर्‍यापैकी झाले मात्र निवडणुकीपूर्वी सोयाबीनला पाच ते सात हजार रुपयांचा भाव देऊ म्हणणार्‍या राज्य सरकारने सोयाबीनला पाच हजारापेक्षा कमी आणि हमीभाव दिला. सोयाबीन खरेदीसाठ नाफेडचे खरेदी केंद्रही जिल्ह्यात काही भागात उघडण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंतवाडी शिवारामध्ये नाफेडचे खरेदी केंद्र आहे. शासनाने सहा जानेवारीला हे खरेदी केंद्र बंद केले. मात्र तेव्हा सोयाबीन विक्रीसाठी शेकडो शेतकरी या खरेदी केंद्रावर रांगा लावून होते. आज पर्यन्त त्या शेतकर्‍यांचं सोयाबीन शासनाने खरेदी केला नाही. गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर सोयाबीनसह ताटकळत बसून आहेत. ज्या वाहनांतून शेतकर्‍यांनी विक्रीसाठी सोयाबीन आणले आहे त्या वाहनाला रोज हजार ते दोन हजार रुपये भाडे द्यावे लागते. आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त भुर्दंड तेथील शेतकर्‍यांवर पडला आहे. रात्रीतून सोयाबीनची (soybean chori)चोरी होऊ नये म्हणून शेतकर्‍यांना रस्त्यावर रात्र जागून काढावी लागत आहे. शेतकर्‍यांचे हाल होत असताना बीड जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन बीड जिल्ह्यातल्या या शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नाफेडने पुन्हा खरेदी सुरू करून हनुमंतवाडी शिवारात सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो शेतकर्‍यांचे (aarthik nuksan)आर्थिक नुकसान अणि मानसिक ताण तात्काळ दूर करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement