मुंबई- सुट्ट्या पैशांवरुन प्रवाशांच्या तक्रारी आणि (st bus)वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन (Pratap Sarnaik)मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांना (upi)यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे.
या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.
बातमी शेअर करा