दिल्ली निवडणुकीपूर्वी 'आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री (arvind kejriwal)अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी हरियाणामधील भाजप सरकारवर यमुना नदीचे पाणी विषारी केल्याचा आरोप केला आहे. या विधानामुळे निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये 5 प्रश्न विचारले आहेत.
या पाच प्रश्नांची उत्तरे द्यायला सांगतली आहेत.
हरियाणा सरकारने यमुना नदीत कोणत्या प्रकारचे विष मिसळले?
ज्या विषामुळे हत्याकांड घडले असेल त्याचे प्रमाण, स्वरूप आणि शोधण्याच्या पद्धतीचे पुरावे काय आहेत?
विष कुठे सापडले?
दिल्ली जल बोर्डाच्या कोणत्या अभियंत्यांनी ते कुठे आणि कसे ओळखले?
दिल्लीत विषारी पाणी येण्यापासून रोखण्यासाठी अभियंत्यांनी कोणती पद्धत अवलंबली?
यमुनेबाबत काय वाद आहे?
(दि.२७) जानेवारी रोजी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून (Hariyana) दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. केजरीवाल म्हणाले होते, 'लोकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही. भाजप आपल्या घाणेरड्या राजकारणाने दिल्लीतील लोकांना तहानलेले ठेवू इच्छित आहे. ते हरियाणाहून पाठवल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळत आहेत.
केजरीवाल पुढे म्हणाले, 'हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की दिल्लीत असलेल्या जलशुद्धीकरण संयंत्रांच्या मदतीने ते प्रक्रिया करता येत नाही. भाजप दिल्लीतील रहिवाशांची सामूहिक हत्या करू इच्छित आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही.