Advertisement

मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित !

प्रजापत्र | Thursday, 30/01/2025
बातमी शेअर करा

जालना -गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण भाजप आ सुरेश धस यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा ईशारा पाटील यांनी यावेळी दिला.

अंतरवली सरटी या ठिकाणी जरांगे  हे (दि.२५)जानेवारी पासून उपोषणास बसले होते. भाजप आ सुरेश धस यांनी बुधवारी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुरुवारी धस पुन्हा पाटील यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी खा बजरंग सोनवणे, जालना जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ उपस्थित होते

Advertisement

Advertisement