Advertisement

सुसाट हायवाने महिलेला चिरडले

प्रजापत्र | Thursday, 30/01/2025
बातमी शेअर करा

 छत्रपती संभाजीनगर - सुसाट जाणाऱ्या रेतीच्या हायवाच्या चाकाखाली येऊन मालनबाई विनायक चौधरी (वय ५०) यांचा जागीच मृत्यु झाला. बुधवार (दि.२९) रात्री ८.३० वाजता चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयासमोर हा (Accident)अपघात झाला.

सविस्तर माहिती अशी कि, केम्ब्रिज चौकातील सुंदरवाडीत राहणाऱ्या मालन कामानिमित्त चिकलठाण्यात गेल्या होत्या. काम आटोपून त्या रुग्णालयासमोर  रस्ता ओलांडत हाेत्या. त्याच वेळी मुकुंदवाडीकडून केम्ब्रिज चौकाच्या दिशेने भरधाव वेगात हायवा चालला होता. रस्ता ओलांडणाऱ्या मालन हायवाच्या समोरील चाकाखाली चिरडल्या गेल्या. त्याच चाकाखाली अडकल्याने मालन यांचा मृतदेह क्रेन लावून काढावा लागला.स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोके, पोट चिरडले गेल्याने (Accident)त्यांचा जागीच मृत्यु झाला होता. घटनेची माहिती कळताच (Midc) एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

Advertisement