धाराशिव- तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पेडी शेजारील सीएम दारूवाले उर्फ (पापा) यांच्या मालकीच्या बाबा फायरवर्क्स या फटाका कारखान्यात बुधवार (दि.२९) रोजी दुपारी अडीच वाजता मोठा स्फोट झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. पण पाच जण जखमी झाले आहेत .यामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश त्यांना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की कारखान्यातील मजूर दुपारी जेवणाच्या सुट्टीत स्फोट झालेल्या खोलीसमोर जेवण करत होते. ते स्फोटामुळे जखमी झाले.त्या खोलीमध्ये गंधक व इतर फटाके बनविण्याचे कच्चे मटेरियल ठेवण्यात आले होते. ही खोली साध्या पत्र्याची बनवली असून ही खोली सुरक्षित नव्हती असे पंचनामा व पाहणी करण्यात आलेल्या तलाठी तसेच वाशी तहसीलदार मेहेत्रे यांचे म्हणणे आहे.स्फोटामुळे या खोलीच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या आहेत. बाहेरील शेजारील शेती बांधाला आग कशामुळे लागली व या रूम पर्यंत येऊन स्पोट झाला याचे नक्की कारण कळू शकले नाही .
बातमी शेअर करा