वाशी - अज्ञात चार सशस्त्र दरोडेखोरांनी इंदापूर येथील प्रल्हाद कवडे यांच्या घरावर दरोडा टाकत (दि.२६) जानेवारी रोजी दोन लाख ५८ ००० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
अधिक माहिती अशी कि,अज्ञात चोरटयांनी इंदापूर येथील प्रल्हाद कवडे यांच्या घराच्या दरवाज्यावर थाप मारल्यानंतर मुलगी संतोषीने दरवाजा उघडताच लोखंडी रॉडने तिच्या डोक्यात मारण्यात आले.आईला देखील मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागीने हिसकावून घेतले.शेजारी राहणाऱ्या रुक्मिणी रामचंद्र काशीद या आरडाओरड झाल्यामुळे बाहेर आल्या त्यांना पण लोखंडी रॉडने हातावर जबर मारहाण करण्यात तसेच घरातील पत्र्याच्या पेट्यामध्ये दोन लाख रुपये तसेच२ तोळे ९ ग्राम सोने व दोन लाख रुपये रोख रक्कम असे दोन लाख 58 000 हजारांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले . सखोल तपासासाठी वाशी पोलिसांकडून सपोनी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथक मागवण्यात आले होते. फॉरेन्सिक पथकाने घरातील एका मोबाईल व घराच्या हँड ड्रॉप वरील ठसे घेतले असून. श्वान पथक चोरी झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर इंदापूर तेरखेडा रोडवरील सह्याद्री हॉटेलपर्यंत जाऊन थांबले. दरोडेखोर तेथून चार चाकी वाहनातून पसार झाले यामुळे श्वान पथक तेथेच थांबले. घटनास्थळास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थोरात, सोपोनी सावंत , इंदापूर बीट अंमलदार जाधवर . संतोषी करडे तिच्या फिर्यादीवरून वाशी पोलिसात अज्ञात चोट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच जखमींना धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.अधिक तपास सपोनी सावंत हे करत आहेत.
इंदापूर सशस्त्र दरोड्यातील एका दरोडेखोरस पकडण्यात पोलिसांना यश
अत्यंत जलद गतीने तपासाची सूत्रे फिरवून वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सावंत साहेब व त्यांचे सहकारी इंदापूर बीट हेड कॉन्स्टेबल जाधवर, कॉन्स्टेबल घुले ,कॉन्स्टेबल मलंगे या सहकार्याने तेरखेडा येथे रविवारी रात्री साडेबारा वाजता उद्धव बापू शिंदे बावी तालुका वाशी वय 26 वर्ष यास मुद्देमाल 90 हजार रुपये सह ताब्यात घेण्यात आले व जेरबंद करण्यात आले इतर आरोपीचा तपास सुरू आहे.