Advertisement

बीड जिल्ह्यात होणार २ अपर तहसीलदार कार्यालयं

प्रजापत्र | Saturday, 25/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि. २५ (प्रतिनिधी ) : राज्यातील नवीन(Beed)जिल्हा आणि तालुका निर्मितीची प्रक्रिया सध्या होणार नसली तरी काही ठिकाणी अपर जिल्हाधिकारी आणि काही ठिकाणी अपर तहसील कार्यालये स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरु झाल्या आहेत. तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. आता शासन त्यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी नवीन जिल्हा आणि नवीन तालुका निर्मितीची मागणी नेहमीच असते. (Beed)बीड जिल्ह्यात देखील (Ambajogai)अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी जुनीच आहे. त्यासोबतच अनेक तऱ्हीकानी तालुका निर्मितीच्या मागण्या झालेल्या आहेत. मात्र सध्या तरी नवीन जिल्हा अथवा तालुका निर्मिती शक्य नसल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने अपर जिल्हाधिकारी आणि अपर तहसील कार्यालये स्थापन करण्याची भूमिका राज्यशासनाने घेतलेली आहे. त्यासाठी प्रत्येक महसुली विभागातून सरकारने प्रस्ताव मागविले होते.
आता छत्रपती संभाजीनगर महसुली विभागातून तसा प्रस्ताव गेला असून (Beed)बीड जिल्ह्यात बीड आणि आष्टी तालुक्यामध्ये अपर तहसील कार्यालये सुरु करण्याचे विभागणीय आयुक्तांनी प्रस्तावित केले आहे. बीड तालुक्यात  नेकनूर येथे तर (Ashti)आष्टी तालुक्यातील कडा येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नेकनूर, चौसाळा , पाली , लिंबागणेश ,  आदी महसूल मंडळाचा समावेश नेकनूरच्या अपर  तहसील कार्यालयात होऊ शकतो , तर कडा अपर तहसील कार्यालयांतर्गत कडा, पिंपळा, धानोरा, दादेगाव , दौलावाडगाव या महसूल मंडळांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे.
आता या प्रस्तावाला शासनाच्या पातळीवर काय केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement