छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची (beed) फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शनिवारी महाविद्यालयातील मुलांशी झालेल्या किरकोळ वादानंतर संक्रांतीदिवशी फ्लॅटवरचे मित्र बाहेर गेले असताना १९ वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या विद्यार्थ्यांची अज्ञातांनी निघृण हत्या केली. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय आहे. मंगळवारी रात्री ११:३० वाजता उस्मानपुऱ्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठा गदारोळ उडाला असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. (Crime News)
मूळ माजलगावचा (Majalgaon) असलेला प्रदीप देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. एक मावसभाऊ आणि अन्य तीन मित्र, असे सोबत भाजीवालीबाई पुतळ्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. उस्मानपुरा भाग हा (crime news)शहरातला गजबजलेला भाग असून महाविद्यालयीन मुलं मोठ्या प्रमाणात या भागात किरायाने रुम करून राहतात.
मंगळवारी महाविद्यालयातून सर्व जण परतले. सायंकाळी त्याचा भाऊ आणि अन्य मित्र बाहेर गेले होते. प्रदीप मात्र एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री १० वाजता ते खोलीवर परतले. तेव्हा प्रदीप गळा कापलेल्या रक्तबंबाळ मृतावस्थेतच दिसला. शनिवारी महाविद्यालयातील मुलांची आणि प्रदीपच्या मित्रांची एकटक का पाहतो, तू कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली होती. संक्रांती दिवशी रात्री मित्र बाहेर गेलेले असताना मारेकऱ्यांनी त्याच्या फ्लॅटवर जात त्याला गळा चिरून मारून टाकले. मित्र फ्लॅटवर परत आले तेंव्हा प्रदीप रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उस्मानपुरा पोलीस ठाण्यात (Usmanpura Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) असे आहे. प्रदीप हा (beed) बीड जिल्ह्यातील पिंपरखेड गावचा रहिवासी होता आणि शिक्षणासाठी सहा वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे राहत होता. तो शहरातील एका नामांकित महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत होता. उस्मानपुरातील रेड कॉलनीत तो चार मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.