Advertisement

नियम डावलून सेतूच्या लाखो रुपयांची उधळपट्टी: तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांचा प्रताप

प्रजापत्र | Saturday, 23/01/2021
बातमी शेअर करा

बीड : सेतू समितीच्या निधीचे मागील अनेक वर्षांपासून लेखापरिक्षण झाले नसल्याने या निधीतून खर्च करणे योग्य नसल्याचा अभिप्राय कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदवलेला असतानाही या निधीतून  ई-पीक पाहणी आणि ई-टपाल वर लाखोंची उधळपट्टी करण्यात  आली आहे.हा प्रताप कर्तव्यदक्ष म्हणवून घेणारे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या काळात त्यांच्या स्वाक्षरीने घडला आहे. 
बीडचे जिल्हाधिकारी असलेल्या राहूल रेखावार यांची तीन दिवसांपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या काळातील अनेक नियमाला बगल देत केलेल्या गोष्टी समोर येत आहेत. जिल्हाधिकारी हे सेतू समितीचे अध्यक्ष असतात . सेतू समितीकडे स्वतःचा असा निधी असतो. मात्र बीड जिल्ह्यातील सेतूच्या निधीचे मागच्या अनेक वर्षांपासून लेखापरीक्षन झालेले नाही. त्यामुळे या निधीतून खर्च केला जाऊ नये असे मत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदवले होते. मात्र असे असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी  ई-पीक पाहणी कार्यक्रमाच्या प्रसार प्रसिद्धीसाठी या निधीतून लाखो रुपये दिले आहेत . त्यासोबतच रेखावार यांचाच ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ई-टपालचे तब्बल १२ लाखाहून अधिकचे बिल याच निधीतून देण्यात आले आहे.विशेष म्हणजे एनआयसीचे ई-ऑफिस हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध असताना रेखावार यांनी 'ई-टपाल' वर ही उधळपट्टी केली आहे. जिल्हाधिकारी पदावरून बाजूला होताना त्यांनी केलेले हे प्रताप भविष्यात मात्र प्रशासनाची डोकेदुखी होणार आहेत.  

Advertisement

Advertisement