बीड-स्वतः डॉक्टर असूनही मुलाच्या हव्यासातून पत्नी आणि मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे घडल्याचे समोर आले आहे.
केज तालुक्यातील सारोळा माहेर असलेल्या प्रियंका ढाकणेचा कळंब जि.उस्मानाबाद येथील पेशाने डॉक्टर असलेल्या विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पहिली मुलगी झाल्याने प्रियंकाला घरात सासरच्याकडून मुलासाठी त्रास दिला जात असे. मात्र दुसऱ्यांदालगा होईल या अपेक्षेने थोडा त्रास कमी झाला होता. मात्र, पाच महिन्यांपूर्वी दुसरी मुलगी झाल्याने तेव्हापासून पती आणि सासरच्या मंडळीकडून मारहाण करत शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता अशी माहिती स्वतः पीडितेने दिली.
त्यातच रात्री याच कारणावरून पतीने मारहाण करत चार महिन्याच्या मुलीसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रियंका सुदैवाने सुटका करून घेण्यात यशस्वी झाली आणि बसस्टँड वर येऊन माहेरच्या मंडळींना फोन केला. तिला शासकीय जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र चार महिन्याची मुलगी अद्यापही राहत्या घरीच आहे. तिच्या ही जीवाला धोका असून सदरील प्रकारची माहिती कळंब पोलीसाना सांगितला असूूून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रजापत्र | Saturday, 23/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा