बीड दि.५ (प्रतिनिधी)- (beed) संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलीस दलावर वेगवेगळे आरोप होत असताना, आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. (Beed police)त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ते केज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.
आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे (kaij)केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. (Beed police)पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी ही मोहीम राबवली आहे.